नमस्कार
मी राज नामदेव मेस्त्री, प्रथम मी या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल आपले आभार मानतो. एका कोकणी माणसाने कुणकेश्वराच्या मंदिराबाबत सांगायचे तर या भुमीत पाऊल ठेवताच मनाला एक वेगळीच अनुभुती मिळते. येथील शुभ्र वाळु, माडांची झाडे, फेसाळणार्या समुद्राच्या लाटा आणि या किनार्यावरील महादेवाचे भले मोठे विलोभनीय मंदिर हे पाहताचं डोळ्यांचे पारणे फिटते, शब्दांत हे सौंदर्य व्यक्त न करण्यासारखेच ! शेकडो वर्षे झाली तरी समुद्राच्या लाटांना तोंड देत हे मंदिर आजही दिमाखात उभे आहे.
कुणकेश्वर मंदिराचा इतिहास फारच जुना आहे. हा इतिहास वाचून शिवशंभुचे दर्शन तुम्हांला माझ्या संकेतस्थळामार्फत घडावे ही इच्छा झाली आणि या मंदिराचे संकेतस्थळ बनविण्याचे काम मी चालू केले.
जगभर कुणकेश्वर मंदिराचा इतिहास समजावा एवढाच हा संकेतस्थळ बनविण्यामागचा हेतू. श्री कुणकेश्वराच्या चरणी माझाकडून ही छोटीशी भेट मी अर्पण करत आहे.
|