मंदिरातील उत्सव
चैत्र : चैत्र या महिन्यात गुढीपाडवा हा सण साजरा होतो. तसेच या महिनाभर देवाची पालखी रोज सायंकाळी निघते. तसेच रामनवमी व हनुमान जयंतीचा उत्सव देवालयाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीजवळील हनुमान मंदिराजवळ होतो.
वैशा़ख : वैशा़खात अक्षय्य तॄतीयाच्या दिवशी उत्सव साजरा केला जातो.
जेष्ठ : जेष्ठ महिन्यात वटपोर्णीमेचा कार्यक्रम साजरा होतो.
आषाढ : आषाढी एकादशी निमित्त काही कार्यक्रम केले जातात.
श्रावण : श्रावण महिन्यात नारळी पोर्णीमा, गोकुळाष्टमी (दहिकाला) उत्सव साजरा होतो. आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाची मनोभावे पुजा केली जाते.
भाद्रपद : भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
अश्विन : घटस्थापना (नवरात्रोत्सव) हा जोगेश्वरी देवीच्या मंदिरात साजरा केला जातो. तसेच विजयादक्षमीच्या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम केला जातो. त्या नंतर दिवाळीतील नरकचतुर्थी व लक्ष्मीपुजन असे उत्सव या दिवशी साजरे होतात.
कार्तिक : या महिन्यात तुलसी विवाह, त्रिपुरी पोर्णिमा तसेच पुर्ण महिनाभर देवाची पालखीची रोज संध्याकाळी मिरवणुक काढली जाते.
मार्गशीर्ष : मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव दक्षिणेकडील हनुमान मंदिराजवळ साजरा केला जातो.
पौष : या महिन्यात मकरसंक्रातीचा कार्यक्रम साजरा होतो.
माघ : माघ महिन्यात महाशिवरात्रीला मोठी यात्रा साजरी होते. विविध ठिकाणाहून लाखो भाविक येथे महादेवाच्या दर्शनासाठी येतात. अमावस्येच्या दिवशी समुद्रस्नान(तीर्थस्नान) करतात. तसेच समुद्रकिनारी पिंडदान वैगरे यासारखे विधी होतात. पाचव्या दिवशी लळीत (शुद्धीकरणाचा) कार्यक्रम केला जातो.
फाल्गुन : फाल्गुन महिन्यात होळी हा सण साजरा केला जातो. |